peoplepill id: vasant-prabhu-1
VP
India
2 views today
2 views this week
Vasant Prabhu
Music director in Marathi film industry

Vasant Prabhu

The basics

Quick Facts

Intro
Music director in Marathi film industry
Places
Work field
The details (from wikipedia)

Biography

वसंत प्रभू (१९२२ - १९६८) हे मराठी चित्रपटातील संगीतकार होते. लता मंगेशकरनी गायलेली त्यन्चि अनेक गीते प्रसिद्ध आहेत. गीतकार पी सावळाराम सोबत प्रभूनी विविध चित्रपटात भागीदारी केली. प्रभूनी संगीत दिलेले प्रसिद्ध गीत म्हणजे "मानसीचा चित्रकार तो", "चाफा बोलेना", "आली हासत पहिली रात", "गंगा जमुना डोळ्यांत उभ्या" व "कळा ज्या लागल्या जिवा".

कारकीर्द

प्रभू लहानपणापासून कथक शिकलेले प्रशिक्षित नर्तक होता. त्याच बरोबर संगीत आणि तालाची पण माहिती होती. पहिले प्रभूनी पुणे कोल्हापूरातिल मराठी चित्रपटात एक अभिनेता म्हणून एक भूमिका मिळवीण्याचा प्रयत्न केला. मराठी चित्रपट राम राम पाव्हणं मधे प्रभूनी काही गाण्यान्ना संगीत दिले व नृत्य पण दिग्दर्शित केले. पुढे लता मंगेशकर यांच्या बॅनर "सुरेल चित्र" अंतर्गत निर्मित चित्रपट वादळ मधे संगीत दिले. त्यातील एका ठुमरीला नागपुर येथील चित्रपटग्रुहात "पुन्हा एकदा" अशी दाद मिळाल्याने तेवढ्याच गीतची वेगळी रीळ बनवण्यात आली. प्रभूनी दिनकर पाटील दिग्दर्शित चित्रपट तारका चे नृत्य दिग्दर्शित केले ज्यात अभिनेत्री सुलोचना लाटकर होत्या.

प्रभूनी पुढील विविध प्रकल्प मंगेशकर आणि गीतकार पी सावळाराम सह केले, जात कन्यादान हा लक्षणीय चित्रपट होता. चित्रपट पुत्र व्हावा ऐसा साठी, तलत मेहमूदनी मराठीत प्रथमच दोन गीते गायली. मेहमूद तेव्हा हिंदी सिनेमातील लोकप्रिय गझल गायक होते.

लेखक मधू पोतदार लिखीत "मानसीचा चित्रकार तो" हे चरित्र मंजुळ प्रकाशनने प्रकाशित केले आहे, ज्याचे नाव प्रभूनी रचलेले एका गीतावर आधारीत आहे. ऑक्टोबर २००८ मध्ये, सोहम प्रतिशथान व अनुबोधने प्रभूच्या आठवणीत "स्वरप्रभू - वसंत प्रभू" कार्यक्रम विलेपार्ले, मुंबईत आयोजीत केला होता.

गीते

गीतचित्रपटगायकगीतकारटिपणी
"आई कुणा म्हणू मी"पुत्र व्हावा ऐसाआशा भोसलेपी सावळाराम
"आली दिवाळी आली दिवाळी"बायकोचा भाऊआशा भोसलेपी सावळाराम
"आली हासत पहिली रात"शिकलेली बायकोलता मंगेशकरपी सावळारामराग हन्सध्वनी
"अनाम वीरा जिथे जाहला"लता मंगेशकरकुसुमाग्रज
"अपुरे माझे स्वप्न राहिले "आशा भोसलेपी सावळाराम
"असा मी काय गुन्हा केला"आशा भोसलेरमेश अणावकरराग पहाडी
"चाफा बोलेना"लता मंगेशकरकवी बीराग यमन
"गा रे कोकिळा गा"बायकोचा भाऊआशा भोसलेपी सावळारामराग हमीर, राग केदार
"गळ्यात माझ्या तूच"आशा भोसलेपी सावळाराम
"गंगा जमुना डोळ्यांत उभ्या"लता मंगेशकरपी सावळाराम
"घरात हसरे तारे असता "लता मंगेशकरदत्ता केसकर
"घरोघरी वाढदिन"लता मंगेशकरपी सावळाराम
"घट डोईवर घट कमरेवर"लता मंगेशकरपी सावळाराम
"गोड तुझ्या त्या स्वप्नामधली"ग्रुहदेवतालता मंगेशकरपी सावळाराम
"का चिंता करिसी"शिकलेली बायकोहृदयनाथ मंगेशकरपी सावळाराम
"काय करू मी बोला"आशा भोसलेपी सावळाराम
"कळा ज्या लागल्या जिवा "लता मंगेशकरभा. रा. तांबे
"कलेकलेने चंद्र वाढतो "मोहनतारा अजिन्क्यपी सावळाराम
"कल्पवृक्ष कन्येसाठी "लता मंगेशकरपी सावळारामराग पहाडी
"कोकिळ कुहुकुहु बोले"कन्यादानलता मंगेशकरपी सावळाराम
"कृष्णा मिळाली कोयनेला "लता मंगेशकरपी सावळाराम
"कुबेराचं धन माझ्या शेतात"शिकलेली बायकोउषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकरपी सावळाराम
"ओळख पहिली गाली हसते "आशा भोसलेपी सावळाराम
"रिमझिम पाऊस पडे सारखा"लता मंगेशकरपी सावळाराम
"उठा उठा सकल जन "पारंपारिक गीतआशा भोसले
"उठि गोविंदा उठि गोपाला"आशा भोसलेपी सावळारामराग भूप, राग देशकार

पूढील वाचन

  • "मानसीचा चित्रकार तो", मधू पोतदार, मंजुळ प्रकाशन ISBN 8189381156

संदर्भ

The contents of this page are sourced from Wikipedia article. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.
Lists
Vasant Prabhu is in following lists

By field of work

By work and/or country

comments so far.
Comments
From our partners
Sponsored
Vasant Prabhu
arrow-left arrow-right instagram whatsapp myspace quora soundcloud spotify tumblr vk website youtube pandora tunein iheart itunes