Vasant Prabhu
Quick Facts
Biography
वसंत प्रभू (१९२२ - १९६८) हे मराठी चित्रपटातील संगीतकार होते. लता मंगेशकरनी गायलेली त्यन्चि अनेक गीते प्रसिद्ध आहेत. गीतकार पी सावळाराम सोबत प्रभूनी विविध चित्रपटात भागीदारी केली. प्रभूनी संगीत दिलेले प्रसिद्ध गीत म्हणजे "मानसीचा चित्रकार तो", "चाफा बोलेना", "आली हासत पहिली रात", "गंगा जमुना डोळ्यांत उभ्या" व "कळा ज्या लागल्या जिवा".
कारकीर्द
प्रभू लहानपणापासून कथक शिकलेले प्रशिक्षित नर्तक होता. त्याच बरोबर संगीत आणि तालाची पण माहिती होती. पहिले प्रभूनी पुणे कोल्हापूरातिल मराठी चित्रपटात एक अभिनेता म्हणून एक भूमिका मिळवीण्याचा प्रयत्न केला. मराठी चित्रपट राम राम पाव्हणं मधे प्रभूनी काही गाण्यान्ना संगीत दिले व नृत्य पण दिग्दर्शित केले. पुढे लता मंगेशकर यांच्या बॅनर "सुरेल चित्र" अंतर्गत निर्मित चित्रपट वादळ मधे संगीत दिले. त्यातील एका ठुमरीला नागपुर येथील चित्रपटग्रुहात "पुन्हा एकदा" अशी दाद मिळाल्याने तेवढ्याच गीतची वेगळी रीळ बनवण्यात आली. प्रभूनी दिनकर पाटील दिग्दर्शित चित्रपट तारका चे नृत्य दिग्दर्शित केले ज्यात अभिनेत्री सुलोचना लाटकर होत्या.
प्रभूनी पुढील विविध प्रकल्प मंगेशकर आणि गीतकार पी सावळाराम सह केले, जात कन्यादान हा लक्षणीय चित्रपट होता. चित्रपट पुत्र व्हावा ऐसा साठी, तलत मेहमूदनी मराठीत प्रथमच दोन गीते गायली. मेहमूद तेव्हा हिंदी सिनेमातील लोकप्रिय गझल गायक होते.
लेखक मधू पोतदार लिखीत "मानसीचा चित्रकार तो" हे चरित्र मंजुळ प्रकाशनने प्रकाशित केले आहे, ज्याचे नाव प्रभूनी रचलेले एका गीतावर आधारीत आहे. ऑक्टोबर २००८ मध्ये, सोहम प्रतिशथान व अनुबोधने प्रभूच्या आठवणीत "स्वरप्रभू - वसंत प्रभू" कार्यक्रम विलेपार्ले, मुंबईत आयोजीत केला होता.
गीते
गीत | चित्रपट | गायक | गीतकार | टिपणी |
---|---|---|---|---|
"आई कुणा म्हणू मी" | पुत्र व्हावा ऐसा | आशा भोसले | पी सावळाराम | |
"आली दिवाळी आली दिवाळी" | बायकोचा भाऊ | आशा भोसले | पी सावळाराम | |
"आली हासत पहिली रात" | शिकलेली बायको | लता मंगेशकर | पी सावळाराम | राग हन्सध्वनी |
"अनाम वीरा जिथे जाहला" | लता मंगेशकर | कुसुमाग्रज | ||
"अपुरे माझे स्वप्न राहिले " | आशा भोसले | पी सावळाराम | ||
"असा मी काय गुन्हा केला" | आशा भोसले | रमेश अणावकर | राग पहाडी | |
"चाफा बोलेना" | लता मंगेशकर | कवी बी | राग यमन | |
"गा रे कोकिळा गा" | बायकोचा भाऊ | आशा भोसले | पी सावळाराम | राग हमीर, राग केदार |
"गळ्यात माझ्या तूच" | आशा भोसले | पी सावळाराम | ||
"गंगा जमुना डोळ्यांत उभ्या" | लता मंगेशकर | पी सावळाराम | ||
"घरात हसरे तारे असता " | लता मंगेशकर | दत्ता केसकर | ||
"घरोघरी वाढदिन" | लता मंगेशकर | पी सावळाराम | ||
"घट डोईवर घट कमरेवर" | लता मंगेशकर | पी सावळाराम | ||
"गोड तुझ्या त्या स्वप्नामधली" | ग्रुहदेवता | लता मंगेशकर | पी सावळाराम | |
"का चिंता करिसी" | शिकलेली बायको | हृदयनाथ मंगेशकर | पी सावळाराम | |
"काय करू मी बोला" | आशा भोसले | पी सावळाराम | ||
"कळा ज्या लागल्या जिवा " | लता मंगेशकर | भा. रा. तांबे | ||
"कलेकलेने चंद्र वाढतो " | मोहनतारा अजिन्क्य | पी सावळाराम | ||
"कल्पवृक्ष कन्येसाठी " | लता मंगेशकर | पी सावळाराम | राग पहाडी | |
"कोकिळ कुहुकुहु बोले" | कन्यादान | लता मंगेशकर | पी सावळाराम | |
"कृष्णा मिळाली कोयनेला " | लता मंगेशकर | पी सावळाराम | ||
"कुबेराचं धन माझ्या शेतात" | शिकलेली बायको | उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर | पी सावळाराम | |
"ओळख पहिली गाली हसते " | आशा भोसले | पी सावळाराम | ||
"रिमझिम पाऊस पडे सारखा" | लता मंगेशकर | पी सावळाराम | ||
"उठा उठा सकल जन " | पारंपारिक गीत | आशा भोसले | – | |
"उठि गोविंदा उठि गोपाला" | आशा भोसले | पी सावळाराम | राग भूप, राग देशकार |
पूढील वाचन
- "मानसीचा चित्रकार तो", मधू पोतदार, मंजुळ प्रकाशन ISBN 8189381156