peoplepill id: sonali-navangul
SN
India
2 views today
3 views this week
Sonali Navangul
Marathi author, translator

Sonali Navangul

The basics

Quick Facts

Intro
Marathi author, translator
Places
The details (from wikipedia)

Biography

जन्म, बालपण आणि शिक्षण

सोनाली नवांगुळ यांचा जन्म २६ ऑगस्ट १९७९ रोजी महाराष्ट्रातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर गावी झाला. पुढे त्या कोल्हापूरला आल्या आणि स्थायिक झाल्या. वयाच्या नवव्या वर्षी बैलगाडी पाठीवर पडून झालेल्या अपघातात त्यांच्या मज्जारज्जूला इजा झाल्याने पॅराप्लेजिया होऊन त्यांना चौथीनंतरचे पदवीपर्यंतचे शिक्षण घरी राहून करावे लागले. केवळ परीक्षेपुरते त्या शाळेत जात, नंतर २००० साली, सोनाली नवांगुळ कोल्‍हापूरच्या ‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड’ या संस्थेच्या उंचगाव येथील, अपंग व्यक्तींच्या शारीरिक गरजांचा सखोल विचार करून बांधलेल्या ‘घरोंदा’ या वसतिगृहात स्वावलंबन – शारीरिक व आर्थिक स्वावलंबन - शिकण्याच्‍या उद्देशाने राहण्यास गेल्‍या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या कोल्हापूरच्‍या शिवाजी पेठेतल्या इमारतीमध्ये तळमजल्यावरील ब्लॉकमध्‍ये, ‘स्वतःच्या घरात’ २००७ साली रहायला गेल्या.

व्यवसाय व कारकीर्द

सोनाली नवांगुळ या भारतातल्या 'स्पर्शज्ञान' नावाच्या पहिल्या नोंदणीकृत मराठी ब्रेल पाक्षिकाच्या २००८ पासून उपसंपादक असून 'रिलायन्स दृष्टी' या ब्रेल पाक्षिकासाठी सातत्याने लेखन करतात; मुक्त पत्रकार म्हणून विविध नियतकालिकांमध्ये विविध विषयांवर लिहितात. अनुवादक व निवेदिका म्हणूनही त्या काम करतात. त्यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रीय सदरांचे संकलन असलेले ‘स्वच्छंद' हे पुस्तक 'मेनका प्रकाशना'ने प्रकाशित केले आहे. दोन्ही पाय नसताना वेगवान धावू शकणाऱ्या ऑस्कर पिस्टोरिअस या धावपटूच्या आत्मकथनाचा त्यांनी केलेला अनुवाद ‘ड्रीमरनर' या नावाने ‘मनोविकास'ने प्रकाशित केला आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमधील स्त्रियांचे लेखन मराठीत यावे याकरता 'मनोविकास' प्रकाशनाची कविता महाजन यांनी संपादित केलेली जी पुस्तक मालिका आली त्यातील सलमा या तमिळ बंडखोर लेखिकेची कादंबरी सोनाली यांनी ‘मध्यरात्रीनंतरचे तास' या नावाने मराठीत आणली आहे. त्यांची आणखी दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. सोनाली यांनी २०१४ मध्ये पुणे येथे झालेल्या 'अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलना'चे अध्यक्षपद भूषविले आहे.

प्रकाशित साहित्य

  • ड्रीमरनर (अनुवाद) - मूळ लेखक ऑस्कर पिस्टोरिअस व गियान्ने मेरलो
  • स्वच्छंद - ललित सदर लेखन
  • मध्यरात्रीनंतरचे तास (अनुवाद) - सलमा या तमिळ बंडखोर लेखिकेची कादंबरी
  • मेधा पाटकर -नर्मदा बचाओ आंदोलनाचा बुलंद आवाज

पुरस्कार

  • सलमा या तमिळ लेखिकेने लिहिलेल्या कादंबरीच्या 'मध्यरात्रीनंतरचे तास' या अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार (२०२१)

संदर्भ

The contents of this page are sourced from Wikipedia article. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.
Lists
Sonali Navangul is in following lists
comments so far.
Comments
From our partners
Sponsored
Credits
References and sources
Sonali Navangul
arrow-left arrow-right instagram whatsapp myspace quora soundcloud spotify tumblr vk website youtube pandora tunein iheart itunes