peoplepill id: dinkar-vasudev-divekar
DVD
2 views today
2 views this week
Dinkar Vasudev Divekar
Writer, Chief Editor of Kesari newspaper

Dinkar Vasudev Divekar

The basics

Quick Facts

Intro
Writer, Chief Editor of Kesari newspaper
Work field
Gender
Male
Age
59 years
The details (from wikipedia)

Biography

Dinkar Vasudev Divekar

दिनकर वासुदेव दिवेकर (१८९८ - १९५७) हे मराठी ललित लेखक होते. ते आद्य व्यक्तिचित्रणकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेले व १९२८ साली प्रसिद्ध झालेले मोतीलाल नेहरूंचे व्यक्तिचित्रण हे मराठीतले पहिले व्यक्तिचित्रण समजले जाते.

दिवेकरांनी ए.जी. गार्डिनरपासून स्फूर्ती घेऊन व्यक्तिचित्रे लिहायाला सुरुवात केली.

दिवेकरांनी लिहिलेली व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके

  • अविस्मरणीय व्यक्तिचित्रे (१९६०) : या संग्रहात ११ व्यक्तिचित्रे आहेत, त्यांपैकी एकही माणूस प्रसिद्ध नाही. कोणत्या बाह्य दर्शनाशिवाय या व्यक्तीची केवळ सूक्ष्म आणि सविस्तर स्वभाववर्णने रंगवली आहेत. ह्या पुस्तकातील महत्त्वाच्या लेखांची नावे अशी : अहो गंगामाई, आमचा नाना बामण, भाऊदास, याचे नाव डाॅक्टर, सुर्वता मावशी, इत्यपि. .
  • स्वभावचित्रे (१९३४) : या संग्रहात सन १९२७पासूनचे लिखाण समाविष्ट आहे. यातली बरीचशी व्यक्तिचित्रे 'रत्नाकर' मासिकातून प्रकाशित होऊन लोकप्रिय झाली होती. राजकीय व्यक्तींपैकी कृ.प्र. खाडिलकर, जवाहरलाल नेहरू, न.चिं. केळकर, महात्मा गांधी, माधव श्रीहरी अणे, मुकुंदराव जयकर, मोतीलाल नेहरू, लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल, शि.म. परांजपे, सुभाषचंद्र बोस ह्या बारा व्यक्तींची चित्रे या पुस्तकात आहेत.

त्यांची अन्य पुस्तके

  • आजचा रशिया (अनुवाद, १९३२)
  • राष्ट्रीय शिक्षण (१९३२)

इतर माहिती

प्रसिद्ध इतिहास संशोधक सदाशिव महादेव दिवेकर हे त्यांचे काका होत. श्री दिवेकर हे प्रसिद्ध मराठी वर्तमान पत्र केसरी ह्याचे प्रमुख संपादक होते. त्यांचा व श्री सुभाषचंद्र बोस यांचा पत्रव्यवहार केसरी वाड्यात म्युझीअम मध्ये जतन केला आहे.

  1. ^ "स.म. दिवेकर". विकिपीडिया. 2022-04-19.
  2. ^ "Kesari (newspaper)". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2022-09-23.
  3. ^ "Netaji Subhash Chandra Bose wanted to learn Marathi - Indian Express". archive.indianexpress.com. 2023-02-19 रोजी पाहिले.
The contents of this page are sourced from Wikipedia article. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.
Lists
Dinkar Vasudev Divekar is in following lists
comments so far.
Comments
From our partners
Sponsored
Credits
References and sources
Dinkar Vasudev Divekar
arrow-left arrow-right instagram whatsapp myspace quora soundcloud spotify tumblr vk website youtube pandora tunein iheart itunes