Neil Anders
Quick Facts
Biography
नील अँडर्स (जन्म २२ फेब्रुवारी १९८२ - लेक हवासु सिटी, एझेड , अमेरिका) हा एक अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट, अभिनेता, ट्रस्टेड रेटचा उपाध्यक्ष आणि फोर्ब्स कौन्सिल सदस्य आहे. अमेरिकन ड्रीम टीव्ही हा अमेरिकन टेलिव्हिजन शो होस्ट करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने मॅड मेन, द १०० आणि द ऑफिस या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले आहे. टेरा रेटिंग्सने त्याला वर्षातील सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन शो होस्टने सन्मानित केले.
कारकीर्द आणि शिक्षण
२००० साली, अँडर्सने उत्तर अॅरिझोना विद्यापीठातून कला शाखेची पदवी पूर्ण केली. २००५ मध्ये त्याने द ऑफिस नावाच्या टेलिव्हिजन शोमधून पदार्पण केले जेथे त्याने विल्यमची भूमिका साकारली होती. हॉलिवूड उद्योगातील त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याने टेलिव्हिजन जाहिरात शूट केले आणि अमेरिकेतील मॉर्टगेज प्रो येथे वरिष्ठ मॉर्टगेज सल्लागार म्हणून काम केले. २००७ मध्ये त्याने मॅड मेनमध्ये अभिनय केला होता जी मॅथ्यू वेनरने तयार केलेली अमेरिकन पीरियड ड्रामा टेलिव्हिजन मालिका होती. २००६-२०१४ दरम्यान त्यांनी फ्रीडम मॉर्टेज येथे शाखा व्यवस्थापक म्हणून काम केले. २०१४ मध्ये तो द १०० नावाच्या सायन्स फिक्शन ड्रामा टेलिव्हिजन मालिकेत दिसला होता जिथे त्याने जॅक्सनची भूमिका साकारली होती. २०१६ मध्ये त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये वेएनसिओ आयएनसि ची स्थापना केली.
फिल्मोग्राफी
- द ऑफिस
- मॅड मेन
- द १००
- अमेरिकन ड्रीम टीव्ही
बाह्य दुवे
नील अँडर्स आयएमडीबीवर
संदर्भ
- ^ "Neil Anders". Forbes Councils (इंग्रजी भाषेत).2022-08-19 रोजी पाहिले.
- ^ Redactie, Door (2022-07-25). "Mortgage Advisor Neil Anders on How He Built a Lasting Legacy With His Unrivaled Client Care". Mashable Benelux (डच भाषेत).2022-08-19 रोजी पाहिले.
- ^ "Neil Anders". EBI Consulting (इंग्रजी भाषेत). 2020-08-01.2022-08-19 रोजी पाहिले.
- ^ Magazine, Top Agent (2021-10-29). "TOP LENDER IN CALIFORNIA NEIL ANDERS". Top Agent Magazine (इंग्रजी भाषेत).2022-08-19 रोजी पाहिले.