peoplepill id: mohan-wagh-1
MW
India
1 views today
5 views this week
Mohan Wagh
Marathi theatre personality

Mohan Wagh

The basics

Quick Facts

Intro
Marathi theatre personality
Places
Work field
Gender
Male
Birth
Age
81 years
The details (from wikipedia)

Biography

मोहन वाघ ( ७ डिसेंबर, इ.स. १९२९ - मृत्यू: २४ मार्च, इ.स. २०१०) हे छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार तसेच नेपथ्यकार होते.

कारकीर्द

मोहन वाघांनी वीस वर्षे वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून काम केले. २३ नोव्हेंबर, इ.स. १९६७ रोजी त्यांनी स्वतःची चंद्रलेखा ही नाट्यसंस्था काढली. तिच्यामार्फत त्यांनी जवळपास ८० नाटकांची निर्मिती करून त्यांचे सोळा हजाराच्यावर प्रयोग केले. ३१ डिसेंबर १९७० रोजी मध्यरात्रीनंतर दोन वाजता 'गारंबीचा बापू' या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी मुंबईच्या शिवाजी मंदिरात केला. त्यानंतर दरवर्षी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन नाटक रंगभूमीवर आणण्याचा पायंडा त्यांनी शेवटपर्यंत जपला.

मोहन वाघांनी नवख्या कलाकारांना घेऊन केलेल्या 'ऑल दी बेस्ट' नाटकाचे तीन हजारांवर प्रयोग झाले आहेत. 'स्वामी'चा शतकमहोत्सवी प्रयोग त्यांनी शनिवारवाड्यावर केला, 'गगनभेदी'चा पहिला प्रयोग त्यांनी लंडनच्या गोल्डन लेन थिएटरमध्ये केला, 'गुलमोहर'चा पहिला प्रयोग विक्रांत युद्धनौकेवर केला तर १० डिसेंबर, इ.स. १९९८ रोजी 'रणांगण' नाटकाचा पहिला प्रयोग पानिपतच्या रणागणांवर केला. १९८८ च्या ३१ डिसेंबरला एकाच दिवशी त्यांनी तीन नवीन नाटकांचे शुभारंभ केले तसेच इ.स. १९९१ साली चंद्रलेखाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त एकाच वेळी मोहन वाघांनी नऊ नाटकांचे मुहूर्त केले. मोहन वाघ यांनी स्वतः 'रात्र उद्याची' आणि 'ब्लॅकगेम' ही दोन नाटके लिहून आणि दिग्दर्शित करून रंगभूमीवर आणली होती.

मोहन वाघ यांनी निर्मिती केलेली प्रसिद्ध नाटके

  • ‘ऑल दी बेस्ट’
  • ‘गगनभेदी
  • ‘गारंबीचा बापू’
  • ‘गुड बाय डॉक्टर’
  • ‘घरात फुलला पारिजात’
  • ‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’
  • ‘ती फुलराणी’
  • ‘रणांगण’
  • ’रमले मी’
  • ‘वाऱ्यावरची वरात’
  • ‘स्वामी’
  • 'दीपस्तंभ'
  • 'आसू आणि हसू'
  • 'गोड गुलाबी'
  • 'संगीत शतजन्म शोधिताना'
  • गंध निशिगंधाचा
  • सोनपंखी

मोहन वाघ यांचे नेपथ्य असलेली ’श्रींची इच्छा’ या नाट्यसंस्थेची नाटके

  • गोलमाल
  • मृत्युंजय
  • संकेत मिलनाचा

पुरस्कार

कमाल अमरोहींच्या पाकिजासाठी त्यांना डिझाईनचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. नाट्य परिषदेतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

मोहन वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’श्रींची इच्छा’ या संस्थेतर्फे चित्रकार रवी परांजपे यांना मोहन वाघ स्मृती पुरस्कार देण्यात आला. (२८-५-२०१५)

इतर

राज ठाकरे हे मोहन वाघ यांचे जावई आहेत.

संदर्भ आणि नोंदी

The contents of this page are sourced from Wikipedia article. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.
Lists
Mohan Wagh is in following lists
comments so far.
Comments
From our partners
Sponsored
Credits
References and sources
Mohan Wagh
arrow-left arrow-right instagram whatsapp myspace quora soundcloud spotify tumblr vk website youtube pandora tunein iheart itunes