Avani B Soni
Quick Facts
Biography
अवनी बी सोनी (१८ डिसेंबर, १९८८) एक भारतीय कास्टिंग दिग्दर्शक आणि कलाकार व्यवस्थापक आहे , तिला चित्रपट लव नि लव्ह स्टोरिज, छत्ती जशे छक्का, तंबूरो या चित्रपटातील कलाकारांच्या कास्टिंगसाठी ओळखले जाते. ती एफएटीसी इव्हेंट आणि एंटरटेनमेंट नावाच्या प्रोडक्शन हाऊस कंपनीची मालक आहे.
मागील जीवन आणि शिक्षण
अवनीचा जन्म १८ डिसेंबर, १९८८ रोजी सुरेंद्रनगर गुजरात येथे झाला होता. ती श्री. बिपिन सोनी यांची मुलगी आहे. अवनीने आपले शालेय शिक्षण सुरेंद्रनगर येथून पूर्ण केले आणि अहमदाबादमधून डिप्लोमा व मास्टर शिक्षण पूर्ण केले आहे.
कारकीर्द
चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी अवनीने कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले. तिने वयाच्या बाविसाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत कारकीर्दची सुरुवात केली. सन २०१७ मध्ये गुजराती फिल्म इंडस्ट्रीत तिने तांबुरो या चित्रपटाद्वारे कास्टिंग दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. २०१८ मध्ये तिने छत्ती जशी छक्का या चित्रपटासाठी कास्टिंग केले होते. सन २०२० मध्ये तिने 'लव नी लव्ह स्टॉरिज' चित्रपटासाठी काम केले जे एक गुजराती ब्लॉकबस्टर चित्रपट होता.
फिल्मोग्राफी
वर्ष | चित्रपट |
---|---|
२०१७ | ताम्बुरो |
२०१८ | छुट्टी जशे छक्का |
२०२० | लव नि लव्ह स्टॉरिज |
बाह्य साइट
अवनी बी सोनी आयएमडीबीवर
संदर्भ
- ^ "Exclusive! Avani Soni: I want to cast Ranveer Singh in a Gujarati film some day - The Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-07-20 रोजी पाहिले.
- ^ "Exclusive! Avani Soni: Dedication, patience and hard work always pay off; that's what I learned from 'Love Ni Love Storys' - The Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-07-20 रोजी पाहिले.
- ^ "Exclusive! Avani Soni: It wasn't easy for me to fight the illness of Chikungunya - The Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-01-05 रोजी पाहिले.
- ^ "Exclusive! Avani Soni: It wasn't easy for me to fight the illness of Chikungunya - The Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-11-07 रोजी पाहिले.
- ^ "કાસ્ટિંગ ડાયરેક્ટર અવની સોની કામ માટે થતા ટ્રાવેલિંગને મિસ કરે છે". Gujarati Mid-day (गुजराती भाषेत). 2020-05-29. 2020-07-20 रोजी पाहिले.
- ^ "Casting director Avani Soni on always travelling outstation for work, says it's hectic but fun - SANTABANTA English". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2020-07-20 रोजी पाहिले.
- ^ "Exclusive Avani Soni Luv Ni Love Storys I love watching the filming process". NEWSJIZZ (इंग्रजी भाषेत). 2020-07-20 रोजी पाहिले.