Amol Kulkarni
Quick Facts
Biography
डॉ. अमोल अरविंद कुलकर्णी (3 डिसेंबर १९७६) हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक पदावर कार्यरत शास्त्रज्ञ आहेत. त्यांना २०२० साली शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात आला.
शिक्षण
अमोल कुलकर्णी यांचे प्राथमिक शिक्षण उद्गीर येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात झाले.
त्यांनी मुंबई येथील इन्स्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून १९९८ साली बी.टेक. (रासायनिक अभियांत्रिकी) ही पदवी, २००० मध्ये एम. टेक. (रासायनिक अभियांत्रिकी) ही पदव्युत्तर पदवी तर २००३ साली पीएच.डी. मिळवली.
कारकीर्द
२००४ ते २००५ या काळात डॉ.कुलकर्णी यांनी जर्मनीमधील मॅक्स प्लँक इन्स्टीट्यूट फॉर डायनमिक्स ऑफ कॉम्प्लेक्स टेक्निकल सिस्टीम्स येथे पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून काम केले. एप्रिल २००५ पासून त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत रासायनिक अभियांत्रिकी विभागात काम करण्यास सुरुवात केली.
डॉ.कुलकर्णी यांनी औषधे, रंग, सुवासिक रसायने आणि नॅनो पदार्थ निर्मितीसाठी लागणाऱ्या रासायनिक भट्ट्याची रचना आणि विकास या क्षेत्रात काम केले आहे. भारतातील पहिली मायक्रोरीॲक्टर लॅबोरेटरी त्यांनी उभारली.
अनेक आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये त्यांचे ४९ शोधप्रबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी भारतात तसेच अमेरिकेत पेटंट दाखल केली आहेत.
ते विद्यावाचस्पती पदवीसाठी (पीएच.डी.) विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून काम करतात.
पुरस्कार
- शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (२०२०)
- डॉ. ए. व्ही. राव अध्यासनासाठी नियुक्ती (२०२०)
- एनसीएल रिसर्च फाऊंडेशनकडून सायंटीस्ट ऑफ द इयर पुरस्कार (२०१३)
- एनसीएल रिसर्च फाऊंडेशनकडून टेक्नोलॉजी ऑफ द इयर पुरस्कार (२०१६)
- VASVIK फाऊंडेशनचा VASVIK पुरस्कार (२०१६)
- सीएसआयआरचा यंग सायंटीस्ट पुरस्कार
- भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीचे युवा शास्त्रज्ञ पदक (२००९)