Shakuntala Phadnis

Indian writer
The basics

Quick Facts

IntroIndian writer
PlacesIndia
isWriter
Work fieldLiterature
Gender
Female
The details

Biography

शकुंतला फडणीस (माहेरच्या शकुंतला बापट) ( , मृत्यू: १६ एप्रिल २०२१, पुणे) या एक मराठी लेखिका आणि बालसाहित्यिक होत्या. शकुंतला फडणीस यांची २०१६ सालापर्यंत २८ पुस्तके प्रकाशित झाली. त्यापैकी तीन पुस्तकांना राज्यस्तरीय व चार पुस्तकांना खासगी पुरस्कार मिळाले आहेत.

कौटुंबिक माहिती

त्यांचे बालपण अमरावतीत गेले. त्यांचे वडील वा.वि. बापट वकील होते तर आई सराफ कुटुंबातील होती.शि.द. फडणीस या व्यंगचित्रकारांच्या त्या पत्‍नी आहेत. त्यांना हिमानी गोगटे आणि रुपाली देवधर नावाच्या दोन मुली, आणि हिमानी, धव, चिन्मय आणि असीम नावाची नातवंडे आहेत.

पुस्तके

  • आजीचा धडा आणि इतर कथा
  • आत कोण आहे? (बालनाट्य)
  • कौतुकाचा गंगाराम
  • गुदगुल्या हसऱ्या अन्‌ बोचऱ्या
  • चमचम घागर
  • पत्राचा प्रवास आणि इतर कथा
  • पैज जिंकली छोट्यानं आणि इतर कथा
  • फोटोवर टिच्चून
  • माझ्या सासूबाई ( प्राथमिक शिक्षक मित्र’च्या अंकातील लेख)
  • मी आणि हसरी गॅलरी
  • व्यंगचित्रांकित साहित्यसंभार (लोकसत्ताच्या २०१३ सालच्या दिवाळी अंकातला लेख)
  • शुभंकरोतीची पन्नास वर्षे (आत्मकथन)
  • संवाद हास्यचित्रांशी
  • सांगना ग आई आणि गोष्टी
  • सोन्यासारखी संधी
  • होल्डॉल

पुरस्कार

  • महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार
  • पुणे महानगर पालिकेचा पुरस्कार
  • माई सावरकर स्मृती सन्मान
  • मालतीबाई दांडेकर स्मृती सन्मान
  • यशवंत-वेणू पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी

The contents of this page are sourced from Wikipedia article on 06 May 2024. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.