Leena Mehendale

Indian administrative service office and author
The basics

Quick Facts

IntroIndian administrative service office and author
PlacesIndia
isAuthor
Gender
Female
The details

Biography

लीना मेहेंदळे (जन्म : घरणगाव-जळगाव-ंखानदेश, ३१ जानेवारी १९५०) ह्या महाराष्ट्र राज्याच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव, लेखिका, गोवा राज्याच्या माजी मुख्य माहिती अधिकारी तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या सदस्या आहेत.

जन्म

लीना मेहेंदळे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे ३१ जानेवारी १९५० रोजी झाला.

कौटुंबिक माहिती

लीना मेहेंदळे यांच्या आईचे नाव लीला असे होते. बिहार राज्यातील दरभंगा या जिल्ह्याच्या ठिकाणी लीनाचे वडील डॉ.बलराम सदाशिव अग्निहोत्री हे 'मिथिला संस्कृत संशोधन संस्थे'मध्ये तत्त्वज्ञान आणि संस्कृत या विषयांचे प्राध्यापक होते.

शिक्षण

लीना मेहेंदळे यांनी भौतिकशास्त्र या विषयात बिहारमधील .सी एम कॉलेद गरभंगा, या महाविद्यालयातून बीएससी ही पदवी संपादन केली. १९७० साली त्यांनी पटना विद्यापीठातून भौतिकशास्त्र या विषयात एम.एस्सी.ची पदवी संपादन केली. १९८९ साली इंग्लंडमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून ‘प्रकल्प नियोजन’ या विषयात एम.एस्सी. पूर्ण केले. १९७४ साली भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले..पुढे हीस्सारयेथील गुरू जांभेकर युनिवर्सिटीतून एमबीए (२००८) व मुंबई विद्यापीठातून एलएलबी (२०१०) या पदव्या घेतल्या.

कारकीर्द

महसूल, प्रशासन, प्रशासकीय कायद्याची अंमलबजावणी, विकास प्रशासन, औद्योगिक विकास, प्रशिक्षण आणि मनुष्यबळ विकास, कार्यालयीन कामकाजात संगणक व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा प्रशासनाच्या सर्वच क्षेत्रातील विषय मेहेंदळे यांनी त्यांनी हाताळले आहेत.

राज्य पातळीवरील काम

लीना मेहेंदळे यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगलीच्या जिल्हाधिकारी, पुण्यातील पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळ यांच्या मॅनेजिंग डायरेक्टर अशा विविध पदांवर काम केले. सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्यात देवदासींची अनिष्ट प्रथा पाळली जात असे. त्यांनी देवदासींना व्यवसाय प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी अवलंबला. सांगलीच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी एकात्मिक ग्रामविकास योजनेअंतर्गत देवदासींच्या आर्थिक पुनर्वसनाचे मोठे काम केले. जत तालुक्यातील सरकारी जमिनीवर देवदासींसाठी घरे बांधून देण्यात आली. त्यांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. देवदासींना यंत्रावर लोकरीचे विणकाम, लोकरीच्या कपड्याचे पॅकिंग, मार्केटिंग या सर्व गोष्टी शिकवल्या. देवदासींनी तयार केलेल्या लोकरीच्या उत्पादनांना पश्‍चिम महाराष्ट्र विकास मंडळाच्या मार्फत बाजारपेठ मिळवून आली. लांबच्या गावातून प्रशिक्षणासाठी येणाऱ्या देवदासींना सायकली दिल्या. या प्रकल्पाच्या माध्यमातून सरासरी २८ ते ४० वयोगटातील १५० महिलांचे आर्थिक पुनर्वसन झाले..

जमाबंदी आयुक्त आणि नाशिकच्या जिल्हाधिकारी असताना लीना मेहेंदळे यांनी कार्यालयांचे संगणकीकरण घडवून आणले. तसेच जमिनींचे नकाशे, जमिनी संदर्भातील कागदपत्रांचे तपशील यांचेही संगणकीकरण करण्यात आले.

राष्ट्रीय पातळीवरील काम

‘पेट्रोलियम कॉन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन’मध्ये त्या संचालक होत्या. ऊर्जा बचतीसंदर्भात जनजागृती निर्माण व्हावी यासाठी आकाशवाणीवरून आणि दूरदर्शनवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या साप्ताहिक मालिकांसाठी मार्गदर्शनाचे काम मेहेंदळे यांनी केले. एनर्जी ऑडिट विभागाची पुनर्रचना करून बायोडीझेल मंत्रालयासाठी नवीन योजना व कार्यक्रमांची आखणी केली.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या जॉईंट सेक्रेटरी या पदावर असताना लीना मेहेंदळे यांनी महाराष्ट्र, बिहार आणि राज्यस्थान या राज्यांमध्ये महिलांविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांचा अभ्यास केला. संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये ‘द कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन’ (सीइडीएडब्ल्यू) या विषयावर झालेल्या परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. पुणे येथे १९८६ साली स्थापन झालेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नेचरोपथी’चे देशव्यापी नेटवर्क त्यांनी तयार केले.

अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग या पदावरून त्या निवृत्त झाल्या. लीना मेहेंदळे या केंद्रीय प्रशासन लवादाच्या सदस्या म्हणून त्यांनी काम केले आहे.

'अधिकारिणी' हे लीना मेहेंदळे आणि इतर महिला अधिकाऱ्यांची माहिती देणारे पुस्तक आहे. संपादक - स्वप्ना जरग.

प्रकाशित साहित्य

चालू घडामोडींबरोबरच शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, बालवाङ्मय, संगणक, कायदा, लोकप्रशासन अशा विविध विषयांवर त्यांचे ५०० लेख आणि २३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लोकप्रशासनातील अनुभवांवर त्यांनी काही पुस्तके लिहिलेली आहेत.

  1. इथे विचारांना वाव आहे - लेखसंग्रह
  2. समाजमनातील बिंब - लेखसंग्रह
  3. प्रशासनाकडे वळून बघताना - लेखसंग्रह
  4. सुप्रशासनाचे पहिले पाऊल - लेखसंग्रह
  5. नित्य-लीला - अनुवादित कथासंग्रह
  6. एक शहर मेले त्याची गोष्ट - अनुवादित कथासंग्रह
  7. आनंदलोक - अनुवादित कवितासंग्रह --कुसुमाग्रज कविताओंका हिंदी अनुवाद
  8. जनताकी राय - लेखसंग्रह हिंदी
  9. है कोई वकील लोकतंत्रका - लेखसंग्रह हिंदी
  10. मेरी प्रांतसाहबी - लेखसंग्रह हिंदी
  11. संगणकाची जादुई दुनिया
  12. कम्प्यूटरकी जादुई दुनिया
  13. मनना जाने मनको - अनुवादित कथासंग्रह हिंदी
  14. भास्वती सरस्वती हिंदी
  15. अन्य पुस्तकें ( एकूण ३०)
  16. चर्चित लेख -- आपली उपेक्षित राष्ट्रीय सौर दिनदर्शिका, क्या गलत हे मायथोलाॅजी शब्द में (हिंदी),

पुरस्कार

  • महाराष्ट्र सरकारचा उषा मेहता हिंदी सेवा पुरस्कार
  • परिधि दिल्ली का लाइफटाइम अचीव्हमेंट पुरस्कार
  • IFFCO का हिंदी सेवा पुरस्कार 2003
  • Energy Conservation Award 2005

संदर्भ आणि नोंदी

The contents of this page are sourced from Wikipedia article on 24 Nov 2024. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.