Kamal Khan

Indian journalist and media personality
The basics

Quick Facts

IntroIndian journalist and media personality
PlacesIndia
isJournalist
Work fieldJournalism
Gender
Male
Birth1959
Age66 years
The details

Biography


कमाल खान हे भारतीय पत्रकार आणि संपादक होते. एनडीटीव्ही इंडिया या राष्ट्रीय हिंदी वाहिनीचे ते लखनऊ, उत्तर प्रदेशचे ब्युरो चीफ होते. खान त्यांच्या काव्यात्मक व्हॉईसओव्हर्स आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणाच्या सखोल विश्लेषणासाठी ओळखले जात असत. त्यांच्या प्रभावी भाषेतील पत्रकारितेसाठी ते प्रसिद्ध होते.

खान यांच्या पत्रकारितील योगदानाबद्दल रामनाथ गोयंका पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला गेला. याबरोबरच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कार दिला होता. एनडीटीव्हीचे सुप्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार त्यांचा लोकप्रिय कार्यक्रम असलेल्या प्राईम टाईममध्ये कमाल खान यांच्या बातम्या नेहमी दाखवायचे.

१४ जानेवारी २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

पुरस्कार आणि सन्मान

  • भारताच्या राष्ट्रपतींकडून रामनाथ गोएंका पुरस्कार
  • भारताच्या राष्ट्रपतींकडून गणेश शंकर पुरस्कार
  • सर्वोत्कृष्ट हिंदी टीव्ही रिपोर्टरसाठी एनटी पुरस्कार
  • पर्यावरण जागृतीवरील सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी पुरस्कार
  • हिंदी टीव्ही पत्रकारितेतील योगदानाबद्दल सार्क लेखक आणि साहित्य महासंघाकडून आंतरराष्ट्रीय पुरस्कार

निधन

कमाल खान यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने १४ जानेवारी २०२२ला लखनौमध्ये निधन झाले. ते घरी असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

संदर्भ

  1. ^ "NDTV's Kamal Khan, Award-Winning Reporter, Dies; Tributes Pour In". NDTV.com. 2022-01-14 रोजी पाहिले.
  2. ^ Bureau, ABP News. "Veteran NDTV Journalist Kamal Khan Dies At 62, Hours After Last Show". ABP Live (इंग्रजी भाषेत). 2022-01-14 रोजी पाहिले.
  3. ^ "Kamal Khan: शब्दांचा जादूगार अन् मन जिंकणारा अवलिया; कमाल खान यांच्या निधनावर पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा". TV9 Marathi. 2022-01-14. 2022-01-27 रोजी पाहिले.
  4. ^ "बड्या टीव्ही चॅनेलचे रिपोर्टर कमल खान यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन". News18 Lokmat. 2022-01-14. 2022-01-27 रोजी पाहिले.
  5. ^ "NDTV's Kamal Khan Dies of Heart Attack, Leaving Behind an Illustrious Legacy in Journalism". The Wire. 2022-01-27 रोजी पाहिले.
  6. ^ "Kamal Khan: शब्दांचा जादूगार अन् मन जिंकणारा अवलिया; कमाल खान यांच्या निधनावर पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा". TV9 Marathi. 2022-01-14. 2022-01-27 रोजी पाहिले.
  7. ^ "NDTV - The Company". www.ndtv.com. 2022-01-27 रोजी पाहिले.
  8. ^ Ganga, A. B. P. "मशहूर पत्रकार कमाल खान का दिल का दौरा पड़ने से निधन, पत्रकारिता जगत में शोक की लहर". ABP News (हिंदी भाषेत). 2022-01-27 रोजी पाहिले.
The contents of this page are sourced from Wikipedia article on 13 Dec 2023. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.